National Institute of Post Harvest Technology

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे

National Institute of Postharvest Technology

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे

🌿 महाज्योती × NIPHT

महाज्योती अंतर्गत विनामूल्य
निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण

Free 5-day residential agricultural skill training for OBC, VJNT and SBC
candidates of Maharashtra

देशातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया – चला… भारत समृद्ध करूया

Home > महाज्योती प्रशिक्षण

कालावधी: ५ दिवस

Duration: 5 days

निवासी प्रशिक्षण

Residential training

पूर्णपणे विनामूल्य

Completely free

माध्यम: मराठी

Medium: Marathi

प्रति अभ्यासक्रम कमाल ५० प्रशिक्षणार्थी

Maximum 50 trainees per course

पूर्णतेनंतर प्रमाणपत्र

Certificate on completion

योजनेविषयी

· About the scheme

महाज्योती, नागपूर यांच्या लाभार्थ्यांसाठी कृषी क्षेत्राशी संबंधित विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठीचा कार्यारंभ आदेश दिनांक ०९.०६.२०२६ रोजी NIPHT संस्थेस प्राप्त झाला आहे.

 

NIPHT received the work order dated 09.06.2026 to conduct agriculture-related skill development training programmes for the beneficiaries of Mahajyoti, Nagpur.

युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व कृषी क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये विकसित करणे या उद्देशाने महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) या प्रवर्गातील बेरोजगार युवक-युवती, शेतकरी तसेच महिला व पुरुष यांच्यासाठी पाच दिवसीय निवासी विनामूल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम NIPHT, तळेगाव दाभाडे, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहेत.

 

To create employment and self-employment opportunities and build agricultural skills, five-day free residential training courses are being organised at NIPHT, Talegaon Dabhade, Pune for unemployed youth, farmers, women and men from the OBC, VJNT and SBC categories of Maharashtra.

आयोजक

· Organisers

इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई

Other Backward & Bahujan Welfare Department, Government of Maharashtra

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर

Mahatma Jyotiba Phule Research & Training Institute (Mahajyoti), Nagpur

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT), तळेगाव दाभाडे, पुणे

National Institute of Post Harvest Technology (NIPHT), Talegaon Dabhade, Pune

प्रशिक्षण अभ्यासक्रम

· The five courses

प्रत्येक अभ्यासक्रम ५ दिवसीय, निवासी व पूर्णपणे विनामूल्य आहे. उमेदवाराने फक्त एकाच अभ्यासक्रमासाठी अर्ज करावा.

Each course is 5-day, residential and completely free. Apply for only one course.

Green House Management
५ दिवस · निवासी · विनामूल्य

हरितगृह व्यवस्थापन

Green House Management

हरितगृह उभारणी, पीक नियोजन, तापमान व आर्द्रता नियंत्रण आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके.

Greenhouse structures, crop planning, climate control and hands-on practicals in the campus poly houses.

Shed Net Construction and Plantation Management
५ दिवस · निवासी · विनामूल्य

शेडनेट उभारणी व लागवड व्यवस्थापन

Shed Net Construction and Plantation Management

शेडनेट गृहाची रचना, उभारणी, लागवड नियोजन व देखभाल.

Shed-net house design, erection, plantation planning and ongoing maintenance.

Cold Chain Management
५ दिवस · निवासी · विनामूल्य

शीत साखळी व्यवस्थापन

Cold Chain Management

प्री-कूलिंग, शीतगृह संचालन, वाहतूक व काढणीनंतरचे नुकसान कमी करणे.

Pre-cooling, cold store operations, refrigerated transport and reducing postharvest losses.

Horticultural Export Training
५ दिवस · निवासी · विनामूल्य

बागायती निर्यात प्रशिक्षण

Horticultural Export Training

निर्यात प्रक्रिया, कागदपत्रे, गुणवत्ता मानके व पॅकहाऊस कार्यपद्धती.

Export procedures, documentation, quality standards and pack-house practices.

Food Processing and Entrepreneurship Development
५ दिवस · निवासी · विनामूल्य

अन्न प्रक्रिया व उद्योजकता विकास

Food Processing and Entrepreneurship Development

फळे व भाजीपाला प्रक्रिया, पॅकेजिंग, परवाने आणि लघुउद्योग उभारणी.

Fruit and vegetable processing, packaging, licensing and setting up a small enterprise.

पात्रता

· Eligibility

✓

महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेले OBC, VJNT किंवा SBC प्रवर्गातील उमेदवार.

Candidates domiciled in Maharashtra belonging to the OBC, VJNT or SBC category.

✓

बेरोजगार युवक-युवती, शेतकरी, महिला अथवा पुरुष.

Unemployed youth, farmers, women or men.

✓

वय १८ ते ४५ वर्षे.

Age between 18 and 45 years.

✓

किमान शैक्षणिक पात्रता ८ वी उत्तीर्ण.

Minimum qualification: 8th standard pass.

आवश्यक कागदपत्रे

· Documents required

1.

जात प्रमाणपत्र

Caste Certificate

2.

महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र

Domicile Certificate of Maharashtra

3.

आधार कार्ड

Aadhaar Card

4.

चालू वर्षासाठी वैध नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र

Non-Creamy Layer Certificate valid for the current year

5.

उच्चतम शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र

Certificate of highest educational qualification

6.

विहित नमुन्यातील अर्ज

Application in the prescribed format

कागदपत्रांच्या झेरॉक्स सत्यप्रतीवर राजपत्रित अधिकारी / माध्यमिक शाळा किंवा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक / पोस्टमास्टर / नोटरीकृत वकील यांपैकी कोणत्याही एका अधिकाऱ्याची स्वाक्षरी व पदनामाची शिक्का असणे आवश्यक आहे.

Every photocopy must carry the signature and designation stamp of a gazetted officer, school/college headmaster, postmaster, or notary advocate.

अर्ज सादर करण्याची पद्धत

· How to apply

विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून स्वहस्ते भरा आणि खालीलपैकी एका मार्गाने पाठवा.

step 1

ई-मेलद्वारे अर्ज

Apply by email

भरलेल्या अर्जाची स्कॅन प्रत व सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती खालील ई-मेलवर पाठवाव्यात.

step 2

पोस्टाद्वारे अर्ज

Apply by registered / speed post

मूळ प्रवेश अर्ज व कागदपत्रांच्या सत्यप्रती रजिस्टर पोस्ट / स्पीड पोस्टद्वारे खालील पत्त्यावर पाठवाव्यात.
लिफाफ्यावर "महाज्योती अंतर्गत प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी अर्ज" व अभ्यासक्रमाचे नाव स्पष्टपणे नमूद
करावे.

मा. संचालक, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT), सर्वे क्र. ३९८ ते ४००, सी.आर.पी.एफ.
कॅम्पशेजारी, जुना पुणे-मुंबई महामार्ग, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे – ४१०५०६

The Director, NIPHT, Survey No. 398–400, next to CRPF Camp, Old Pune–Mumbai
Highway, Talegaon Dabhade, Tal. Maval, Dist. Pune – 410506

⚠️ सूचना: पोस्टाने कोणतीही मूळ कागदपत्रे (जात व अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, नॉन-क्रीमी लेअर प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता इ.) पाठवू नयेत. मूळ कागदपत्रे हरवल्यास संस्था जबाबदार राहणार नाही.

 

Important: never post original certificates. Send attested photocopies only — the institute is not responsible for originals lost in transit.

निवड प्रक्रिया व सूचना

· Selection process and rules

01

उमेदवारांनी इच्छित एका प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावीत. अर्ज करण्यापूर्वी प्रशिक्षणाची माहिती व स्वरोजगार संधी जाणून घेण्यासाठी NIPHT कार्यालयाशी संपर्क साधून समुपदेशन घ्यावे. संपर्क क्रमांक: 02114-255480

Apply for only one course and attach all required documents. Contact NIPHT during office hours for counselling before applying. Phone: 02114-255480

02

सर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम पाच दिवसांचे निवासी असून प्रशिक्षणामध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो.

All courses are five-day residential programmes conducted in Marathi.

03

प्रत्येक अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त ५० प्रशिक्षणार्थींची निवड करण्यात येईल.

A maximum of 50 trainees will be selected for each course.

04

विभाग ३० अर्ज प्राप्त झाल्यानंतर NIPHT मार्फत अर्ज व पात्रतेची प्राथमिक छाननी करण्यात येईल. त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी अंतिम मान्यतेसाठी महाज्योती, नागपूर कार्यालयाकडे सादर करण्यात येईल.

Once at least 30 applications are received, NIPHT will carry out a preliminary scrutiny of applications and forward the list to Mahajyoti, Nagpur for final approval.

05

"प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या तत्त्वावर अर्जांचा विचार करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल अथवा दूरध्वनीद्वारे बॅचची तारीख कळविण्यात येईल.

Applications are considered on a first-come, first-served basis. Selected candidates will be informed of their batch dates by email or phone.

06

निवड झालेल्या बॅचमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक आहे. विनाकारण अनुपस्थित राहिल्यास पुढील कोणत्याही बॅचसाठी विचार करण्यात येणार नाही.

Attendance in the allotted batch is compulsory. Unjustified absence disqualifies the candidate from all future batches.

07

प्रत्येक उमेदवार फक्त एका अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतो. एकापेक्षा अधिक असे अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द करण्यात येतील.

Each candidate may apply for only one course. Applying for more than one course cancels all applications.

08

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. हरवलेले किंवा खराब झालेले प्रमाणपत्र पुन्हा देण्यात येणार नाही.

A certificate is awarded on successful completion. Lost or damaged certificates will not be re-issued.

09

कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती, बनावट कागदपत्रे किंवा फसवणूक आढळल्यास उमेदवाराचे प्रशिक्षण त्वरित रद्द करण्यात येईल व उमेदवारी रद्द करण्यात येईल.

If false information, forged documents or fraud is found, the full training cost will be recovered and the candidature cancelled.

10

प्रशिक्षण स्थळी जाण्या-येण्याचा प्रवास खर्च उमेदवाराने स्वतः करावयाचा आहे.

Travel to and from the training venue is at the candidate's own cost.

11

प्रशिक्षणार्थींची अंतिम निवड करण्याचा अधिकार महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांच्याकडे राहील.

Final selection rests with Mahajyoti, Nagpur.

12

तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणास्तव कोणताही अभ्यासक्रम, बॅच किंवा संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया रद्द अथवा स्थगित करण्याचा अधिकार महाज्योती, नागपूर यांच्याकडे राहील.

Mahajyoti, Nagpur reserves the right to cancel or postpone any course, batch, or the entire training process due to technical or administrative reasons.

समुपदेशन व संपर्क

· Counselling and contact

इच्छुक उमेदवारांनी अभ्यासक्रमासाठी अर्ज करणेपुर्वी समुपदेशनासाठी संबंधित प्रशिक्षणाचे स्वरुप,लाभ,स्वयंरोजगार संधी,व त्यामधील जोखीम याचे संपूर्ण माहिती घ्यावी.याबाबत NIPHT संस्थेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधून माहिती घ्यावी.संपर्क क्रमांक:02114-255480

अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेल अथवा दूरध्वनीद्वारे प्रशिक्षणाच्या बॅचची तारीख कळविण्यात येईल.

Please take counselling during office hours before applying. Batch dates are published on the NIPHT
website and confirmed by phone.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

· FAQ

मी एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतो का? / Can I apply for more than one course?

नाही. प्रत्येक उमेदवारास फक्त एकाच अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येईल; एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द होतील. No – only one course per candidate; multiple applications lead to all of them being cancelled.

प्रशिक्षणासाठी काही शुल्क आहे का? / Is there any fee?

नाही. प्रशिक्षण व निवास पूर्णपणे विनामूल्य आहे. फक्त येण्या-जाण्याचा प्रवास खर्च उमेदवाराने करावयाचा आहे. The training and stay are completely free; only travel is at your own cost.

निवड कशी होते? / How is selection done?

“प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” तत्त्वावर छाननी होते, अंतिम मान्यता महाज्योती, नागपूर देतात. Applications are screened first-come, first-served, and Mahajyoti, Nagpur gives the final approval.

बॅचची तारीख कशी कळेल? / How will I know my batch date?

अर्ज छाननी व महाज्योतीच्या मान्यतेनंतर तारीख NIPHT संस्थेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल व फोन/ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. Dates are published on the NIPHT website and communicated by phone or email.

मूळ कागदपत्रे पोस्टाने पाठवावीत का? / Should I post original certificates?

नाही. पोस्टाने कोणतीही मूळ कागदपत्रे पाठवू नयेत; फक्त सत्यप्रती पाठवाव्यात. मूळ कागदपत्रे हरवल्यास संस्था जबाबदार राहणार नाही. Never post originals – send attested photocopies only.

प्रमाणपत्र मिळेल का? / Will I get a certificate?

होय. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जाते; डुप्लिकेट प्रमाणपत्र दिले जात नाही. Yes, on successful completion. Duplicates are not issued.